7th Pay Commission : मोदी सरकार ‘या’ कर्मचार्‍यांना देणार स्पेशल भत्ता, जाणून घ्या कुणाला होणार फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सरकारने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये तैनात अखिल भारतीय सेवा (All India Service) अधिकार्‍यांना मोठी भेट दिली आहे. केंद्राने आर्थिक दिलासा देण्यासाठी अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन अंतर्गत विशेष भत्ता देण्याची घोषणा केली आहे. मिंटच्या वृत्तानुसार, हा विशेष भत्ता (स्पेशल अलाऊन्स) लडाखमध्ये तैनात अधिकार्‍यांना (उत्तर पूर्व एआयएसचे कॅडर) दिला जाईल.

बदलणार 7 व्या वेतन आयोगाचे मॅट्रीक्स

केंद्राच्या या पावलानंतर, लडाखमध्ये तैनात एआयएस अधिकार्‍यांना अतिरिक्त देय विशेष भत्ता आणि विशेष
शुल्क भत्ता त्यांच्या मुळ वेतनाच्या 20 टक्के आणि 10 टक्केच्या हिशेबाने मिळेल. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर लडाखमध्ये तैनात एआयएस अधिकार्‍यांचे 7 व्या वेतन आयोगाचे मॅट्रिक्स बदलणार आहे. कामगार आणि प्रशिक्षण विभागाने या संबंधात अगोदर कार्यालयीन सूचना जारी केली आहे.

1 जुलैपासून मिळणार डिएचा लाभ

केंद्र सरकारने 52 लाख कर्मचार्‍यांसाठी डीए देण्याची घोषणा सुद्धा केली होती. सरकारच्या घोषणेनुसार 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकार कर्मचार्‍यांना डीएचा लाभ जारी करणार आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी मागील महिन्यात राज्यसभेत याबाबत माहिती दिली होती. ऑल इंडिया कंझ्यूमर प्राईस इंडेक्स (एआयसीपीआय) डेटा रिलिजनुसार, जानेवारीपासून जून 2021 च्या दरम्यान किमान डीएमध्ये 4 टक्केची वाढ केली जाऊ शकते.

जाणून किती वाढणार सॅलरी

डीए जारी केल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 17 टक्के वाढून 28 टक्के होऊ शकतो. यामध्ये जानेवारी ते जून 2020 पर्यंत डीएमध्ये 3 टक्के वाढ, जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारी ते जून 2021 पर्यत 4 टक्के वाढीचा समावेश आहे.