गुजरात : लाखो सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! वाढणार पगार

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरात सरकारने अलीकडेच राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. या कर्मचार्‍यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता बुधवारीच ५ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. म्हणजेच १२ टक्के ऐवजी १७ टक्के महागाई भत्ता मिळेल. हा बदल १ जुलै २०२० पासून लागू होईल.

मिळणार वाढीव पगार :
राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन डीए जानेवारीच्या पगारासह उपलब्ध होईल. त्याचबरोबर संबंधित थकबाकी दोन ते तीन हप्त्यांमध्ये भरली जाईल. पटेल यांच्या म्हणण्यानुसार थकबाकी देयकाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. पटेल म्हणाले की, राज्य कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या डीए अनुरुप हा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर अलीकडेच केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए १२ वरून १७ टक्के करण्यात आला आहे.

सरकारी तिजोरीवरचा वाढणार बोजा :
पटेल म्हणाले की, वाढत्या डीएमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाकाठी १८२१ कोटींचा अतिरिक्त भार सोसावा लागेल. या बदलाचा लाभ पंचायत कर्मचार्‍यांनाही मिळणार आहे. त्याआधी मागील वर्षी जूनमध्ये गुजरात सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ केली होती. हा बदल जानेवारी २०१८ पासून अंमलात आला. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाकाठी १०७१ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढला.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/