7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

अहमदाबाद : 7th Pay Commission | गुजरातमध्ये संपावर गेलेल्या दोन हजारपेक्षा जास्त डॉक्टरांची एक मोठी मागणी राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे त्यांच्या Salary मध्ये हजारो रुपये महिना वाढ होणार आहे. गुजरात सरकारने सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि Gujarat Medical Education and Research Society (GMERS) medical colleges च्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारसीनुसार नॉन-प्रॅक्टिस अलाऊन्स (non practise allowance) ला मंजूरी दिली आहे.

डेप्युटी सीएमने केली घोषणा

उपमुख्यमंत्री (Deputy CM) नितिन पटेल, ज्यांच्याकडे राज्याचा आरोग्य विभाग सुद्धा आहे, त्यांनी डॉक्टर आणि मेडिकल कॉलेजच्या शिक्षकांसाठी सणासुदीची भेट म्हणून जाहीर केली. शिक्षक यासाठी दबाव आणत होते आणि मागणीसाठी संपावर गेले होते.

पटेल यांच्या Facebook पेजवर लिहिले आहे की, उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी सरकारी हॉस्पिटलच्या पात्र कार्यरत डॉक्टर आणि GMERS मेडिकल कॉलेजच्या शिक्षकांना रक्षाबंधनची भेट म्हणून सातव्या वेतन आयोगानुसार नॉन-प्रॅक्टिस अलाऊन्सला (एनपीए) मंजूरी दिली आहे.

7th Pay Commission अंतर्गत पे कमिशनमध्ये मेडिकल डॉक्टर आणि शिक्षकांसाठी स्पेशल
मंथली अलाऊन्सची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये NPA ला 10 हजार रुपये ते 35 हजार
रुपये महिना दिले जातात. सरकारच्या या पावलानंतर आता डॉक्टरांना सॅलरीत 7th Pay Matrix
च्या हिशेबाने 10 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होईल.

हे देखील वाचा

New Labour Code | 1 ऑक्टोबरपासून बदलणार कामगार कायदा, इनहँड सॅलरीवर होणार परिणाम, 12 तास काम!

Salary Slip | नोकरीमध्ये सॅलरी स्लिपचे काय आहे महत्व, जाणून घ्या कामाच्या 10 महत्वाच्या गोष्टी
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission latest news today doctors in gujarat govt hospitals to get non practise allowance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update