7th Pay Commission latest update : ‘या’ कर्मचार्‍यांना मोठी भेट, नाईट ड्यूटी अलाऊन्सवर आला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रेल्वे कर्मचार्‍यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वेने नाईट ड्यूटी करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळणार्‍या अलाऊन्सच्या नियमात बदल केला आहे. प्रकरण 43,600 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचार्‍यांना नाईट अलाऊन्स न देण्याचे आहे. अशी चर्चा होती की जर अशा कर्मचार्‍यांना नाईट अलाऊन्स मिळाला असेल तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून या पैशांची रिकव्हरी केली जाईल.

रेल्वे डिपार्टमेंटने सध्या रिकव्हरीवर प्रतिबंध लावला आहे आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल आणि ट्रेनिंगला रिकव्हरीवर प्रतिबंध लावण्यासाठी पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की जे कर्मचारी विविध स्थितीत नाईट ड्यूटी करतात त्यांच्यासाठी नाईट अलाऊन्सची व्यवस्था झाली पाहिजे. रेल्वे कर्मचारी युनियन्सने मोठा जोर लावून हा मुद्दा मंत्रालयासमोर उचलला.

उत्तर रेल्वेच्या दिल्ली डिव्हिजनचे महासचिव अनूप शर्मा यांनी मीडियाला सांगितले की, रेल्वेने नाईट अलाऊन्सच्या रिकव्हरीवर सध्या प्रतिबंध लावला आहे. विविध रेल्वे युनियन्सने नाईट अलाऊन्सच्या रिकव्हरीवर सध्या प्रतिबंध लावला आहे. विविध रेल्वे युनियन्सने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली होती की जर कामगारांना नाईट अलाऊन्स दिला गेला नाही तर त्यांना नाईट ड्यूटीला बोलावण्यात सुद्धा येऊ नये.

नाईट ड्यूटी अलाऊन्सच्या गणनेच्या नियमात सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल तात्काळ प्रभावाने लागू सुद्धा करण्यात आले आहेत. नाईट ड्यूटीच्या गणनेच्या तयार करण्यात आलेल्या नव्या फार्म्युल्यानुसार बेसिक सॅलरी+डीए/200 च्या आधारावर अलाऊन्स ठरवला जाईल. हा फार्म्युला सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये लागू होईल.

एक मोठा बदल हा करण्यात आला आहे की, जे कर्मचारी नाईट ड्यूटी करतील. त्यांच्या दिवसांची गणना सुपरवायजरच्या रिपोर्टच्या आधारावर केली जाईल. म्हणजे कोणता कर्मचारी किती दिवस नाईट ड्यूटी करतो याचे सर्टिफिकेट सुपरवायजरकडून घ्यावे लागेल. ग्रेड ए च्या सर्व कर्मचार्‍यांना एकच नाईट ड्यूटी अलाऊन्स मिळेल. अलाऊन्स तेव्हा मिळेल जेव्हा कर्मचारी रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेदरम्यान काम करतील.