7 वा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘पगार वाढ’ आणि ‘प्रमोशन’ संदर्भात सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या संपण्यापूर्वी वेतन दरवाढी संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला जाणार होता परंतु अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच पुन्हा एकदा याबाबतचा निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत घेतला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. मोदी सरकारने अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दरवाढीसाठी मंजुरी दिलेली नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ
50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा आहे की सरकार किमान वेतनामध्ये वाढ करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर संपेपर्यंत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना याबाबतची खुशखबरी देऊ शकते. नोव्हेंबरमधीच होणारी दरवाढ अद्याप न झाल्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष आता डिसेंबर महिन्याच्या निर्णयाकडे लागले आहे. आर्थिक मंदिमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यामुळे इच्छा असूनही सरकारला निर्णयाची अंमलबजावणी करता येत नहिये कारण सरकारने वेतन वाढ केली तर यामुळे सरकारवर अतिरिक्त बोझा वाढणार आहे.

वेतन वाढ आणि बढती संदर्भात मोठी घोषणा
केंद्रीय मंत्रालयाच्या विभागाने केंद्रीय नागरी सेवांच्या नियम 10, 2016 रोजी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पदोन्नती आणि वेतन वाढीसंदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे. या नियमानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेनुसार 1 जानेवारी किंवा 1 जुलै पर्यंत वेतनवाढ मिळेल. या नियमांतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना पदोन्नती आणि आर्थिक उन्नतीची सुविधा मिळते.

सरकारने बढती संधर्भात दिले मोठे स्पष्टीकरण
1 जानेवारी ते 1 जुलै दरम्यान करण्यात आलेली वेतन वाढ 1 जानेवारीलाच दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर ज्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 2 जुलै ते 1 जानेवारी दरम्यान पगारवाढ करावी लागेल त्यांना आता 1 जुलै रोजी अनुदान देण्यात येणार आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी एखाद्या कंचाऱ्याला बढती मिळाली तर त्याचा पुढील लाभ 1 जुलै किंवा 1 जानेवारीला मिळेल. वेतनवाढीचा लाभ एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल.

इंक्रीमेंट संदर्भात स्पष्टीकरण
सहाव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वार्षिक इंक्रीमेंट 1 जुलै पर्यंत मिळत असे. ज्या कर्मचाऱ्यांने रिवाइज्ड पे स्ट्रक्चरनुसार 6 महिने पूर्ण केलेले आहेत त्यांनाच 1 जुलै पर्यंत वाढीव पगार दिला जात होता. परंतु सातव्या वेतन आयोगाने त्यासाठी दोन तारखा निश्चित केल्या, वेतनवाढीची तारीख 1 जानेवारी आणि 1 जुलै ठेठेवण्यात आली आहे.

Visit : Policenama.com