7 वा वेतन आयोग : ‘या’ सरकारी नोकरदारांना प्रमोशनची ‘भेट’, पगारात ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाखो केंद्रीय कर्मचारी पगार वाढण्याची वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की कॅबिनेट बैठकीनंतर केंद्र सरकार सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगारात वाढ करण्याची घोषणा होईल. परंतू आतापर्यंत यावर निर्णय झाला नाही. असे असले तरी भारतीय डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार सरकारने डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला (प्रमोशनचा) हिरवा कंदील दाखवला आहे.

या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन –
एका वृत्तानुसार, सरकारने डाक कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनला हिरवा कंदील दाखवला आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या ‘मॉडीफाइड एश्योर्ड कॅरिअर प्रोग्रेशन स्कीम’ अंतर्गत प्रमोशन देण्याची तयारी केली आहे. सरकारने क्लॅरिफिकेशन जारी करुन स्पष्ट केले आहे की, या अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळाले पाहिजे. परंतू याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. सातव्या वेतन आयोगांतर्गत ही योजना आणण्यात आली होती, ज्या अंतर्गत निश्चित करण्यात आले की, ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कार्य उत्तम नाही त्यांना अॅनुअल अप्रेजल किंवा इंक्रीमेंट मिळणार नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा –
केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले की, मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात बदल करणार नाही. अर्थ राज्यमंत्री अनुरान ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात बदल करणार नाही. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष असेल. तर डॉक्टर आणि विद्यापीठाच्या निवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्ष असेल.

जानेवारीत या कर्मचाऱ्यांच्या उत्पनात वाढ –
जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. ही वाढ 720 रुपयांपासून तर 10,000 रुपयांपर्यंत असू शकते.