7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट ! महागाई भत्ता, DR यामुळे ‘घरभाडे’ भत्त्यात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सातव्या वेतन आयोगानुसार मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central staff) एक खुशखबर देण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि DR (Dearness Relief) मध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ झाली आहे. तसेच अन्य भत्ता देखील वाढला. या सगळ्याचा लाभ हा HRA म्ह़णजेच घरभाडे भत्यात झाला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत जून 2021 पर्यंत DA आणि ‘डीआर’सह अन्य सर्व भत्त्यांत कोणतीही वाढ केली नव्हती. दरम्यान यंदा (7th Pay Commission) केद्रीृंय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक भेट दिली आहे.

सरकारने 1 जुलैपासून केद्रींय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 28 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि DR मध्ये 11 टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. यावरुन सरकारच्या 48 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.

Baramati Crime | दुर्देवी ! अंजनगावात शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

महागाई भत्ता (DA) नवा दर 17 टक्क्यावरुन 28 टक्के झाला. याबरोबर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता (HRA) मध्ये देखील बदला झाला. घरभाडे भत्ता (HRA) वाढवून 27 टक्के करण्यात आाला. यामुळे याचा कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. सणासुदीच्या काळामध्येच कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक गिफ्ट देण्यात आली आहे

दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरांनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के घरभाडे भत्ता (HRA) मिळणार आहे.
सध्या तिन्ही वर्गांसाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के इतका घरभाडे भत्ता (HRA) मिळतो.
5400, 3600 आणि 1800 असा तिन्ही कॅटेगरीसाठी कमीतकमी घरभाडे भत्ता (HRA) होईल.
म्हणजेच HRA मध्ये विविध कॅटेगरीसाठी 1-2 टक्केंनी वाढ केली आहे.
असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं (Union Ministry of Finance) म्हटलं आहे.
या दरम्यान, आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना HRA चा लाभ घेता येत आहे.
महागाई भत्ता ज्याप्रमाणे वाढवण्यात आला आहे. तसेच, HRA कॅलक्युलेट केला जातो.
7th Pay Matrix नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक पगार 56 हजार रुपये प्रति महिना असेल तर त्याला 27 टक्केप्रमाणे घरभाडे भत्ता (HRA) मिळणार आहे.

हे देखील वाचा

SBI नं जिंकलं कोटयावधी ग्राहकांचं मन, कर्जाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Covid 19 Drugs | नव्या औषधानं फक्त 5 दिवसात कोरोना रुग्ण होणार ठणठणीत – सीडीआरआयचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission | modi government employees hra hike rs 15120 know calculation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update