7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लवकरच मिळणार, PF ची रक्कमही वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स आपल्या महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. येत्या जुलै महिन्याच्या पगारात हे भत्ते मिळतील अशी अपेक्षा आहे. हा भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार जानेवारीच्या अहवालाप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटामुळे जानेवारी ते जुन 2020 आणि जुलै ते डिसेंबरपर्यंत त्यांना महाभाई भत्ता मिळाला नव्हता. केंद्राने म्हटले आहे, की, महागाई भत्त्याची देय 1 जुलैपासून दिली जाईल. तसेच जानेवारी 2020 ते जून 2020, जूलै 2020 ते डिसेंबर 2020, आणि जानेवारी 2021 ते जून 2021 दरम्यानचे डीए जुलैच्या पगारात जोडले जाणार आहे. बेसिक सॅलरी आणि डीए मिळून प्रोव्हिडंट फंड जमा केला जातो. आता डीए वाढणार असेल PF ची रक्कमही वाढणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने डीए आणि डीआर मिळतो. तो वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या महिन्यात राज्यसभेत लिखित उत्तरात म्हटले होते की, 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना DA चा फायदा होईल. आतापर्यंत थकलेले सर्व डीए दिले जातील. त्यात होणाऱ्या वाढीचाही कर्मचाऱ्यांना लाभ होईल असे म्हटले होते.