7th Pay Commission: ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! NPS चे नियम झाले सोपे, आता 3 वर्षाच्या नोकरीनंतर पैसे काढता येणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) ने नवोदय विद्यालय संघटनेच्या (एनव्हीएस) कर्मचार्‍यांना नॅशनल पेन्शन स्कीमअंतर्गत रक्कम काढण्याची संधी दिली आहे. नवोदय विद्यालय संघटनेच्या सर्व कर्मचार्‍यांना एनपीएसच्या बदललेल्या नियमांचा लाभ मिळेल. जानेवारी 2018 मध्ये पीएफआरडीएने एनपीएसच्या नियमात बदल केले होते. यानुसार एनपीएस खातेधारकाला 25% पार्शियल विड्रॉल करण्याची संधी मिळते. ही संधी कोणत्याही कर्मचार्‍याला एनपीएस खाते बंद करण्यापूर्वी पर्यंत दिली जाते. यासोबतच नॅशनल पेन्शन स्कीमचे फायदे घेण्यासाठी कर्मचार्‍याला किमान 3 वर्ष नोकरी करावी लागेल.

एनपीएसमधून पैसे काढण्यासाठी कर्मचार्‍याला सर्वप्रथम नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट किंवा केंद्रीय संस्थेत अर्ज करावा लागेल. परंतु, लक्षात ठेवा की, एनपीएस कर्मचारी केवळ 3 वेळाच खात्यातून विड्रॉल करू शकतात. तसेच, विड्रॉल 5 वर्षाच्या अंतरानेच होऊ शकते.

-मुलांचे उच्च शिक्षण
-मुलाचा विवाह
-घराचे बांधकाम किंवा खरेदी
– आजारपण

नॅशनल पेन्शन सिस्टम एक सरकारी योजना आहे. ही जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर 2009 मध्ये ती सर्व सेक्शनसाठी खुली करण्यात आली. या तारखेनंतर जॉइन करणार्‍या सर्व सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही योजना जरूरी आहे. 2009 नंतर ही योजना प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्‍या लोकांनाही खुली करण्यात आली.

ही स्कीम रोजगारादरम्यान आपल्या सॅलरीचा एक भाग पेन्शन अकाउंटमध्ये जमा करण्याची संधी देते. रिटायर झाल्यावर हा पैसा एकत्रित परत केला जातो.

– सर्व प्रथम यूजरने Enps.nsdl.com/eNPS किंवा Nps.karvy.comच्या वेबसाइटवर लॉग इन   करावे.
– त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि डिटेल्स भरा.
– तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, जो व्हेरिफिकेशनसाठी असतो.
– येथे बँक अकाउंट डिटेल्स भरा.
– यानंतर पोर्टफोलियोचा आणि फंडचा पर्याय निवडा.
– येथे नामांकित व्यक्तीचे नाव नोंदवा.
– विचारलेल्या डिटेल्स भरा. नंतर तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट एनपीएसमध्ये करावा लागेल.
– पेमेन्ट केल्यानंतर तुमचा परमनन्ट रिटायरमेन्ट अकाउंट नंबर जनरेट होईल.
– इन्व्हेस्टमेन्ट केल्यानंतर e-sign/print registration form पेजवर जा. येथे तुम्ही पॅन आणि       नेटबँकिंगसह रजिस्टर करू शकता.