7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. महागाई भत्त्या (DA) संदर्भात नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) आणि अधिकाऱ्यांची शनिवारी (दि. 26) बैठक होत आहे. या बैठकीमुळे जुलैमध्ये महागाई भत्ता (7th pay commission) मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डीए मिळतो. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली आहे. 7th pay commission not only da but for central govt employees these 7 demands will also fulfill soon

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचे (DA) 3 हप्ते मिळणे बाकी आहेत. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत.

बैठकीत या विषयावर होणार चर्चा

1) जे केंद्रीय कर्मचारी सीजीएचएसच्या (Central Government Health Scheme) बाहेर आहेत. त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम लागू व्हायला हवी.

2) ज्या शहरात सीजीएचएस (Central Government Health Scheme ) सुविधा नाही आहे, त्याठिकाणी पेन्शनर्सच्या झालेल्या खर्चासाठी रिएम्बर्समेंट मिळायला हवी

3) रुग्णालयांच्या रिएम्बर्समेंटची तरतूद.

4) कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला भत्ता मिळायला हवा

5) कर्मचाऱ्यांना मेडिकल अ‍ॅडव्हान्स मिळायला हवा

6) 2004 नंतर आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जनरल प्रोव्हिडेंट फंडची (GPF) सुविधा मिळायला हवी

7) ग्रुप इन्शुरन्स स्कीममध्ये (Group Insurance Scheme) रिव्हिजन व्हायला हवी

Web Title : 7th pay commission not only da but for central govt employees these 7 demands will also fulfill soon

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

OBC Reservation | आमच्या हाती सत्ता द्या, 4 महिन्यात आरक्षण देतो अन्यथा राजकीय संन्यास घेतो – फडणवीस (व्हिडीओ)