7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर ! ‘या’ राज्यातील कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ, 1 जानेवारी 2020 पासून मिळणार वाढलेला पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनानुसार महागाई भत्ता वाढ ही १ जानेवारी २०२० पासूनच लागू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या जवळपास ३.५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

याशिवाय राज्य सरकारने १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत थकीत असणारी १० टक्के थकबाकी भरण्यास सांगितले आहे. कर्मचारी आता आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दरम्यान ओडिशा सुधारित वेतनश्रेणी (ORSP) – २०१७ नुसार पगाराच्या आढाव्यानंतर उद्भवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थकबाकीच्या १० टक्के वेतन मिळू शकेल. याआधी सरकारने आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या दरम्यान १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१७ या कालावधीतील एकूण थकबाकी पैकी ४०% वाटप केले आहे.

You might also like