7th Pay Commission Pensioners | सरकारने जारी केला अलर्ट, 25 मेपर्यंत उरकून घ्या हे काम; अन्यथा रखडू शकते पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission Pensioners | संरक्षण मंत्रालयाने बुधवारी डिफेन्स पेन्शनर्सला मासिक पेन्शन नियमित मिळण्यासाठी 25 मेपर्यंत आपली वार्षिक ओळख पूर्ण करण्याचा मेसेज जारी केला आहे. मंत्रालयानुसार, आतापर्यंत मिळालेल्या आकड्यांमध्ये आढळले आहे की, डिफेन्स पेन्शनर्सने ऑनलाइन सिस्टम SPARSH मध्ये मायग्रेट केले आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांनी वार्षिक ओळख (Annual Identification) / जीवन प्रमाणपत्र (Life Certificate For Pensioners) पूर्ण केलेले नाही.

 

25 मेपर्यंत द्यायची आहे वार्षिक ओळख
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या संरक्षण मंत्रालयाने पेन्शन घेणार्‍या पेन्शनर्सला सांगितले आहे की, 25 मेपर्यंत वार्षिक ओळख म्हणजे जीवन प्रमाणपत्र पूर्ण करावे. जेणेकरून त्यांना विना अडथळा पेन्शन मिळू शकेल. पेन्शनर्सने हे काम 25 मेपर्यंत उरकून घ्यावे. सरकारनुसार, 43,774 पेन्शनर्सने ऑनलाइन आणि बँकेला वार्षिक ओळख दिलेली नाही. (7th Pay Commission Pensioners)

 

अजून करतात जुन्या पद्धतीचा वापर
याशिवाय जुने पेन्शनधारक पेन्शनच्या जुन्या पद्धतीवर कायम आहेत. सांगण्यात आले आहे की त्यांनीही, कोणत्याही माध्यमातून आपली वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही. असे सुमारे 1.2 लाख पेन्शनर्स आहेत.

 

अशी देऊ शकता वार्षिक ओळख

मोबाईल यूजर डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन/जीवनप्रमाण फेस अ‍ॅपद्वारे करू शकतात.

पेन्शनर्स वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊ शकतात. आपल्या परिसरातील सीएससी येथे ऑनलाईन पाहू शकता.

पेन्शनर्स जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी जवळच्या डीपीडीओमध्ये सुद्धा जाऊ शकतात. जुने पेन्शनर्स आपल्या बँकेत जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी जाऊ शकतात.

 

Web Title :- 7th Pay Commission Pensioners | 7th pay commission defence pensioners request to complete annual identification to get monthly pension

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा