7th Pay Commission | 31 टक्के DA झाल्यास सॅलरीत होईल जबरदस्त वाढ, जाणून घ्या गणित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना सणासुदीच्या काळापूर्वी आणखी एक खुशखबर मिळू शकते. कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनर्ससाठी महागाई मदत (DR) मध्ये वाढीची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकताच डीए 17 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के केल्याची घोषणा केली होती. आता त्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के आणखी (7th Pay Commission) वाढ होऊ शकते.

जुलै 2021 चा डीए अद्याप ठरवलेला नाही, परंतु जानेवारीपासून मे 2021 च्या AICPI आकड्यांवरून स्पष्ट होते की, यामध्ये 3 टक्के वाढ होऊ शकते. अशाप्रकारे 3 टक्के आणखी वाढल्यानंतर महागाई भत्ता 31 टक्केवर पोहचणार आहे (The DA is expected to reach 31 per cent). मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार दसरा किंवा दिवाळीच्या जवळपास डीए वाढवण्याची घोषणा करू शकते.

 

11 टक्के वाढला आहे महागाई भत्ता

मागील वर्षीच्या तुलनेत एकुण डीए 11 टक्के वाढला आहे. सरकारने जुलै 2021 पासून तो 28 टक्के केला आहे. आता जून 2021 मध्ये जर तो 3 टक्के वाढला तर यानंतर महागाई भत्त्यासह (17+4+3+4+3) 31 टक्केवर पोहचू शकतो. जर एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 50,000 रुपये आहे तर त्यास 15,500 रुपये महागाई भत्ता मिळेल.

 

कशी होईल पगारात वाढीची गणना

कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी जर 56900 रुपये आहे तर नवीन महागाई भत्ता म्हणजे 31 टक्केअंतर्गत
17639 रुपये महिना भत्ता मिळेल तर 28 टक्केच्या दराने 15932 रुपये/महीना होईल म्हणजे एकुण 1707 रुपये महागाई वाढेल.
म्हणजे सॅलरीत एकुण वाढ वार्षिक 20484 रुपये होईल.

Web Title : 7th pay commission salary of central govt employees to increase during festive season check calculation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update