7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission Updates | केंद्र सरकार (Central Govt) अर्थसंकल्पानंतर आता केंद्र सरकारी कर्मचारी (Central Govt Employees) आणि निवृत्त कर्मचार्‍यांना (Pensioners) मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्याची (DA) थकबाकी देऊ शकते. वृत्तानुसार, सरकार गेल्या 18 महिन्यांची डीए थकबाकी एकाच वेळी जमा करण्याची तयारी करत आहे. (7th Pay Commission Updates)

 

हा निर्णय घेतल्यास येत्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकाचवेळी दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते. (7th Pay Commission DA Hike)

 

कोरोनामुळे डीए वाढीवर लावला होता प्रतिबंध
सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 60 लाख पेन्शनधारकांना फायदा होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, National Council of Joint Consultative Machinery (JCM) सेक्रेटरी (Staff Side) शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, परिषदेने एकाच वेळी डीए थकबाकी भरण्याची विनंती पाठवली आहे. (7th Pay Commission Updates)

 

कोरोना महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 ते जून 2021 पर्यंत डीए वाढ रोखली होती. नंतर डीए आणि डीआरची वाढ बहाल करण्यात आली, मात्र जुनी थकबाकी जमा करण्यात आली नाही.

आता इतका होईल डीए
वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central Cabinet) बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. साधारणपणे वर्षातून दोनदा डीए वाढवला जातो. यावेळी जानेवारीत होणारी डीए वाढ अद्याप जाहीर झालेली नाही.

 

याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने डीए 17 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. जानेवारी 2022 साठी डीए 3 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. यामुळे डीए 34 टक्क्यांपर्यंत वाढेल.

 

या पेन्शनधारकांनाही लाभ
महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी, DA-DR वाढीचा लाभ केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक माजी कर्मचार्‍यांना वर्षातून दोनदा दिला जातो.

 

जर येत्या बैठकीत 18 महिन्यांची थकबाकी जमा करण्याचा निर्णय घेतला तर लेव्हल-1 कर्मचार्‍यांना 11,880 ते 37,554 रुपये मिळतील.
त्याचप्रमाणे लेव्हल-13 कर्मचार्‍यांना एकाच वेळी 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळू शकतात.

 

Web Title :-  7th Pay Commission Updates | 7th pay commission latest update da arrears payment soon central govt cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale-Ajit Pawar | उदयनराजे भोसले-अजित पवारांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप खासदार म्हणाले…(व्हिडीओ)

 

Narayan Rasne Passes Away | पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव