7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांना नवीन वर्षात मोठं ‘गिफ्ट’ मिळण्याची शक्यता, पगार वाढ होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करू शकते, असा अंदाज काही कर्मचारी संघटनांनी वर्तविला आहे. या ४ टक्के वाढीला मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार सुमारे ७५० रूपये ते १० हजार रूपयांपर्यंत वाढू शकतो. यासंदर्भातील निर्णय लवकर झाल्यास नवीन वर्षाचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळू शकते.

महागाईचा दर जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधित वाढला आहे. या महागाईची झळ सर्वांनाच बसत असल्याने सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. परंतु, ही वाढ नेमकी किती होणार, हे महागाईच्या दरावर ठरते. मागील सहा महिन्यांचा महागाईचा वाढता दर पाहता सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देऊ शकते, असा अंदाज विविध कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून किमान वेतन आणि फिटमेंटमध्ये वाढ करा, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी करत आहेत. किमान वेतन १८ हजार रुपयांवरून २६ हजार करावे, २.५७ टक्के असलेले फिटमेंट ३.६८ टक्के करावे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. सध्याची देशाची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती, भविष्यात वाढणारा आर्थिक बोजा, याचा विचार करता सरकार यासंदर्भातील निर्णय घेईल अथवा नाही याबाबतही साशंकता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/