7th Pay Commission Updates : ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी ‘खुशखबर’ ; महागाई भत्त्यात होऊ शकते ५% वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जुलैच्या अखेरपर्यंत सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ % वाढ केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईची झळ बसू नये म्हणून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या तीन वर्षातील ही सगळ्यात मोठी वाढ आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिल्या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसंबंधी कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे बऱ्याच काळापासून पगार वाढ करण्याची मागणी करणारे केंद्रीय कर्मचारी सरकारवर नाखूष होते. आता ७ व्या वेतन आयोगाकडून त्यांच्यासाठी एक खुशखबर मिळू शकते.

सातव्या वेतन आयोगाची स्थापना २०१४ साली झाली. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि वेगवेगळ्या राज्यातील कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पगारात वाढ केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईची झळ बसू नये याची देखील काळजी वेतन आयोगाकडून घेतली जाते. महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय वेतन आयोगाकडून घेतला जातो.

जानेवारी २०१९ मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ३% वाढ केली होती. या आधी अर्थसंकल्प २०१८ मध्ये महागाई भत्त्यात २% वाढ केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच