खुशखबर ! 6 कोटीपेक्षा अधिक PF खातेदारांना होणार फायदा, ‘व्याजदर’ वाढीचे ‘नोटिफिकेशन’ कुठल्याही क्षणी

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – नोकरदार वर्गासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, भविष्य निर्वाह निधी खात्यावर (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याजासंबंधित मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी माहिती दिली की, वित्त वर्ष 2018-19 च्या पीएफ वर 8.65 टक्के व्याज मिळेल. यासाठी वित्त मंत्रालय तयार आहे. वित्त मंत्रालय व्याजदरांचे नोटिफिकेशन लवकरच जारी करेल. याचा थेट फायदा 6 कोटी खातेधारकांना मिळणार आहे.

ईपीएफ खातेधारकांना 8.65 टक्के व्याज
ईपीएफ व्याजदराबाबत बऱ्याच कालावधीपासून वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात सहमती नव्हती. अखेर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, ईपीएफ खातेधारकांना 8.65 टक्के व्याज मिळेल. यानंतर लवकर यासंबंधित नोटिफिकेशन जारी करण्यात येईल.

पुढील आठवड्यात व्याजदराचे नोटिफिकेशन येणार
बऱ्याच दिवसापासून वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात सहमती होत नव्हती. संतोष कुमार गंगवार आणि वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्यात या महत्वाच्या मुद्यावर बैठक पार पडली. यानंतर ईपीएफ संबंधित व्याजदरावर सहमती मिळाली. पुढील आठवड्यात नोटिफिकेशन जारी होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –