सौंदर्य वाढवण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी, ‘हे’ आहेत 8 आश्चर्यचकित करणारे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकता. यापैकीच एक आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे. याच्या अल्कालाईन घटकांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टीक आणि अँटी इंफ्लेमेट्री गुण असतात. सौंदर्य वाढीसाठी बेकिंग सोड्यात औषधीसुद्धा आहे. त्वचेवर बेकिंग सोड्याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट आवश्य करा.

बेकिंग सोड्याचे आश्चर्यकारक फायदे :
1 पिंपल्स
पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा सोडा थोड्या पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट पिंपल्सच्या जागी एक दोन मिनिटांसाठी लावून ठेवा. दिवसातून 2-3 वेळा हा उपाय करा.

2 दातांचा पिवळेपणा
दाताच्या पिवळेपणा घालवण्यासाठी ब्रशवर थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा घेऊन ब्रश केल्यास दातांचा पिवळेपणा निघून जातो. पण याचा जास्त वापर करू नका.

3 टॅन
सनबर्न दूर करण्यासाठी बेकिंग सोडा थंड पाण्यात मिक्स करून सरसरीत पेस्ट बनवून स्वच्छ कपड्यावर ही पेस्ट घेऊन ती सनबर्नने प्रभावित जागी लावा.

4 चेहरा उजळेल
चेहरा उजळण्यासाठी बेकिंग सोडा गुलाब पाण्यात मिक्स करून काही मिनिंट चेहर्‍याला लावा.

5 स्वच्छ नखं
नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा, पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं मिश्रण करून नखांना लावा. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा.

6 शरीराची दुर्गंधी
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून अंडरआर्म्सला लावा. नंतर धुवून टाका.

7 निरोगी स्कॅल्प
केसांच्या स्वच्छतेसाठी आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

8 डँड्रफ
केसांतील डँड्रफ घालवण्यााठी ओल्या केसांवर एक चमचा बेकिंग सोडा हळूहळू चोळा आणि काही वेळाने धुवून टाका.