पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ‘मुस्कान’ पथकाकडून 8 मुलांचा शोध

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ‘मुस्कान’ मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या मुलांचा शोध, तसेच रस्त्यावर कचरा गोळा करणारी मुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळी भीक मागणाऱ्या मुलांची माहिती घेऊन ती संबंधीत संकेतस्थळावर भरून त्यांच्या पालकांचा शोध घेऊन मुलांना पालकांकडे सुपुर्द करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडचे आयुक्त पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस ठाण्यात मुस्कान पथक स्थापन केले आहे. या मोहिमेअंतर्गत चाकण, चिंचवड, हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यातील मुस्कान पथकाने अत्तापर्यंत 8 बालकांचा शोध घेतला आहे. यामध्ये 5 मुली आणि 3 मुलांचा समावेश असून या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही मोहीम 31 डिसेबर पर्यंत आयुक्तालयात राबविली जात आहे. मुस्कान पथके ही पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधाकर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्तरावर मुस्कान पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी मारुती जायभाये, महिला पोलीस कर्मचारी दिपाली टोपे, आशा जाधव यांनी मुलांचा शोध घेतला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/