Coronavirus : पुण्यात 8 दिवसांच्या चिमुकलीचा ‘कोरोना’मुळे मृत्यू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 13 जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरामध्ये आतापर्यंत 800 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (रविवार) अवघ्या 8 दिवसाच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यतच्या शहरातील मृत्यूमध्ये या कोरोना बाधित रुग्णाचे वय कमी आहे.

शनिवारी पुण्यात 827 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होत. तर 16 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 904 वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरात 816 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 16 हजार 996 रुग्णांनी कोरोनामवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभामार्फत देण्यात आली आहे.

उद्यापासुन पुन्हा लॉकडाऊन
पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर 13 ते 24 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात केवळ दूध, औषध दुकाने आणि दवाखाने सुरु राहणार आहेत. वृत्तपत्राचे वितरणही या काळात सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरामध्ये 19 जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे.