राजकारणासाठी लष्कराचा वापर नको ; ८ माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – राजकारणासाठी लष्कराचा वापर करणे थांबवावे. त्यासाठी स्पष्ट आदेश देण्यात यावेत असं आवाहन करणारं पत्र ८ माजी सेना प्रमुखांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं आहे. त्यांच्यासोबत १०० पेक्षा जास्त माजी जवानांनी या पत्रावर आपल्या सह्या केल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत राजकिय पक्षांकडून भारतीय लष्कराने केलेल्या मोहिमांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. अशा आशयाचे पोस्टर्सही पाहायला मिळाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात लष्कराचा वापर प्रचारात करू नये असे आवाहन केले होते.

लष्कराच्या सेक्यूलर मूल्यांचे रक्षण व्हावे अशी विनंती त्यांनी केली आहे. जनरल एसएफ रॉड्रीग्ज, जनरल शंकर रॉय चौधरी, जनरल दीपक कपूर, एडमीरल लक्ष्मीनारायण रामदास, एडमिरल विष्णू भागवत, एडमिरल सुरेश मेहता, चीफ मार्शल एनसी सुरी अशा बड्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. पत्रात कोणत्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आला नाही.