संधिवाताच्या त्रासाने त्रस्त असाल तर करा ‘हे’ 6 घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज संधिवाताने बरेच जण त्रस्त आहेत. संधिवात होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील वाढणारं यूरिक ऍसिडचं प्रमाण. संधिवात कमी करायचा असेल तर शरीरातील यूरिक ऍसिडचं प्रमाण कमी केलं पाहीजे. सांधेदुखीच्या रूग्णांना कधीकधी असह्य वेदना देखील सहन करावी लागतात. बरेच लोक प्रश्न करतात की यूरिक ऍसिड कमी कसे करावे? सांधेदुखीच्या समस्येमध्ये सांधे दुखतात तसेच चालण्यास आणि उठताना खूप त्रास होतो. तसेच हातपाय सुजणे हेदेखील शरीरातील युरिक ऍसिड वाढल्याचं लक्षण आहे. अशा परिस्थितीत युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काही घरगुती उपचारही आहेत ते आपण केले तर आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन संधिवाताचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

1. लसूण जोरदार फायदेशीर आहे-

संधिवात असलेल्या रुग्णांनी आहारात लसूण खाल्ल्यास खूप फायदा होऊ शकतो. लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील यूरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. संधिवातवर उपचार करण्यासाठी लसूण हा सर्वात प्रसिद्ध आणि फायदेशीर उपाय आहे. रोज आहारात थोड्या प्रमाणात लसून आहारात घेतल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या तीन ते चार कळ्या घेतल्यास फायदा होतो. हे खाण्यासाठी तुम्ही मीठ, जिरे, हिंग, मिरपूड आणि कोरडे आले आणि मध घालू शकता.

2. ‘आलं’देखील एक गुणकारी-

आलं सांधेदुखीमध्ये वेदना कमी करण्यास चांगलेचा उपयुक्त ठरू शकतात. आल्यामध्ये लसूणसारखेच अँटी ऑक्सीडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी (antioxidant and anti inflammatory) गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे संधिवात कमी होण्यास मदत होते. संधिवातात ज्या ठिकाणी सांधे जास्त दुखतात त्या ठिकाणी तेल लावल्यास शरीराला चांगला आराम मिळतो.

3. ‘कोथींबीर’ही आहे उपयोगी-

यामध्ये देखील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. याचे सेवन पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात तसेच ते संधिवातावरही गुणकारी आहे. आपण दररोज भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी कोथींबीर वापरल्यास आपल्याला यूरिक ऍसिडपासून आराम मिळू शकेल. कोथींबरीत अजून असे बरेच आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत, त्यामुळे आपल्या आहारात जर कोथींबिरीची सामावेश केला तर आपल्याला बऱ्याच रोगांवर मात करण्यासाठी मदत होते.

5.पाणी भरपूर पिण्यानेही होता फायदा-

आपण जर रोज भरपूर प्रमाणात पाणी पिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. पाणी भरपूर पिल्यास आपल्या शरीरातील यूरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. पाणी जास्त पिल्यान जर आपल्याला वारंवार लघवी होत असेल काही अडचण नाही. पण यामुळे तुम्हाला सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

‘फायबर’युक्त आहार घ्या-

फायबरयुक्त आहाराच्या सेवनाने यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवलं जाऊ शकतं. आहारात फायबरची जास्त मात्रा असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहीजे. मका, बाजरी, बार्ली, गाजर, डाळी, वाटाणे तसेच राजमासारख्या पदार्थात फायबरचे प्रमाण चांगलं असतं. हे वरील सर्व सर्वसाधारण उपाय आहेत.