पहिल्या ८ अयशस्वी प्रयत्नांनंतर ३५ वर्षीय महिलेने ९ व्या खेपेला दिला बाळाला जन्म

मदरहूड हॉस्पिटलने जोडप्याला लग्नाच्या १८ वर्षांनी दिला पालकत्वाचा आनंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलतर्फे एका जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या १८ वर्षांनंतर आणि ८ अयशस्वी प्रयत्नांनंतर अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची गर्भावस्था पार करण्यास मदत करून पालकत्वाचा आनंद दिला.

पुण्यातील श्रीमती अनिता आणि वीरेंद्र त्रिपाठी यांनी आपल्या १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात चार गर्भपतने (मिसकॅरेजेस) अनुभवली आणि ४ वेळा नवजात बालकांच्या मृत्यूला ते सामोरे गेले. अनिता यांचे आपले पहिले बाळ २००२ साली दगावले. त्यानंतर दर २ वर्षांनी त्या अशाच परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. पुणे आणि दिल्लीतील अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. त्यांचे प्रसूतीचे रिपोर्ट्स सामान्य असायचेपण बाळ जगत नव्हते. पण या जोडप्याने आशा सोडल्या नाहीत. इतक्या अवघड परिस्थितीत दोघांनीही एकमेकांना सांभाळून घेतले. अखेर त्यांची प्रार्थना फळाला आली आणि जून २०१८ मध्ये त्या गरोदर राहिल्या. त्यांची गर्भावस्था अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची होती. सात महिन्यांनी (२८ आठवडे) अचानक उल्बद्रव बाहेर आल्याने त्यांना पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये हा प्रसंग घडला. भ्रूणाचा मेंदू सुरक्षित राहावा आणि फुफ्फुसे परिपक्व राहावीत यासाठी त्यांना औषधे देण्यात आली. त्याचप्रमाणे संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिजैविके देण्यात आली. त्याचप्रमाणे तत्काळ प्रसूती होऊ नये यासाठीही औषधे देण्यात आली. ११ जानेवारी २०१९ रोजी अनिता यांची मुदतपूर्व प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला. त्याचे वजन १.३ किलो होते.

पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ आणि मॅटर्नल-फेटल मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, “प्रसूती लांबवणे आमचे उद्दिष्ट होते. कारण जगातील कोणत्याही इनक्युबेटरपेक्षा गर्भाशय हे सर्वोत्तम इन्क्युबेटर असते. पण भ्रूणाचे संरक्षण करण्यासाठी पाणी नसल्याने बाळाल संसर्ग होणार नाही आणि इतर कोणतीही गुंतागुंत निर्माण होणार नाहीयाची खातरजमा करण्यात आली. ३० व्या आठवड्यात प्रसूती करण्यात आलीकारण गर्भाशयात बाळाला धोका असल्याची चिन्हे दिसू लागली.

मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सचिन भिसे म्हणाले, “जन्मल्यानंतर बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याला डिलीव्हरी रूममध्ये तत्काळ श्वसनसाहाय्याची गरज होती. बाळाला निओनॅटल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि आधुनिक नॉन-इन्व्हेसिव्ह (छेद द्यायची आवश्यकता नसलेल्या) तंत्राच्या साहाय्याने श्वसनास साह्य देण्यात आले. सेप्सिस टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आणि टीपीएनच्या (टोटल पॅरेंटल न्यूट्रिशनच्या) माध्यमातून बाळाला पूर्ण पोषक साह्य देण्यात आले.”

या आईच्या पोटी जन्मलेल्या नवजात बालकांच्या मृत्यूची पार्श्वभूमी लक्षात घेत या वेळी एनआयसीयूमध्ये बाळाच्या पचनसंस्थेतील आजारांची तपासणी करण्यात आली आणि मुदतपूर्व प्रसूतीमुळे होऊ शकत असलेल्या रेटिनोपथीची (डोळ्यांच्या पटलाचा आजार) चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे जन्मजात होणाऱ्या आजारांसाठी इकोकार्डियोग्राफीमेंदूमूत्रपिंड आणि यकृतीची अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली. हॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान मातेला कांगारू केअर,स्तनपान आणि बाळाच्या स्वच्छतेविषयी प्रशिक्षित करण्यात आले. बाळाचे वजन एका महिन्याने १.७ किलो झाले आणि त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

मदरहूड हॉस्पिटलमधील प्रमुख निओनॅटोलॉजिस्ट आणि एनआयसीयूचे इन-चार्ज डॉ. तुषार पारिख म्हणतात, “जगभरातील मुदतपूर्व प्रसूतींपैकी २४% मुदतपूर्व प्रसूती भारतात होतात आणि प्रमाण वजनापेक्षा कमी वजन असलेल्या बाळांपैकी ४०% बाळे भारतात जन्मतात. दुर्दैवानेकमी वजन असलेल्या आणि मुदतपूर्व प्रसूत झालेल्याबाळांपैकी ८०% बालकांचे मृत्यू होतात. मुदतपूर्व प्रसूतीच्या प्रकरणांमध्ये माता वेळेत टर्शरी पेरिनॅटल सेंटरमध्ये आल्या तर बाळाचा जीव कशा प्रकारे वाचवता येऊ शकतेमुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना वेळेवर उपचार मिलाले तर बाळांचा जीव वाचवता येऊ शकतो आणि ती बाळे सामान्य आयुष्य जगू शकतातया बाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. या बाळाचा फॉलो-अप घेतल्यानंतर दिसून आले आहे कीबाळाची वाढ सामान्य प्रकारे होत आहेते स्तनपान स्वीकारत आहे आणि त्याचे वजनही वाढत आहे.”

रुद्रांश या नवजात बालकाची आई अनिता त्रिपाठी म्हणाल्या, “मदरहूड हॉस्पिटलचा अनुभव अतुलनीय होता आणि जगातील सर्वोत्तम होता. आई होण्यात ८ वेळा अपयशी ठरल्यानंतर मी उद्धवस्त झाले होते. जेव्हा मी ९ व्या खेपेस गरोदर होते तेव्हा बाळाच्या जिवंत राहण्याबाबत मी साशंक होते. मी नेहमी भीतीच्या सावटाखाली असे आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची खात्री वारंवार डॉक्टरकडून करून घेत असते. जेव्हा मी माझ्या बाळाचा आवाज पहिल्यांदा ऐकला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्ही १८ वर्षे याच क्षणाची वाट पाहत होतो. आम्ही आमचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करू शकलोयाचा आम्हाला आनंद आहे. रुद्रांश आता ४ महिन्यांचा आहे आणि त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. आम्हाला घरी अत्यंत स्वच्छता राखण्याचा आणि त्याचे संसर्गांपासून संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

“आम्हाला १८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली पण आता आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि त्यांच्या अमर्यादित प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”असे बाळाचे वडील वीरेंद्र त्रिपाठी म्हणाले.

मदरहूड हॉस्पिटलबद्दल
मदरहूड हॉस्पिटल हे आघाडीचे महिला व मुलांचे हॉस्पिटल असून ते महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. प्रसूतीस्त्रीरोगप्रजनन,निओनॅटोलॉजीबालरोगफेटल मेडिसीन आणि रेडियोलॉजी अशा सर्व विभागातील आरोग्यसेवा मिळत असल्याने प्रत्येक महिला व बाळाच्या उपचारांसाठी या हॉस्पिटलला प्राधान्य देण्यात येते. नवजात बालके आणि मुलांना या ठिकाणी उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्यात येते. यात २४ तास उपल्ध असलेली पिडअ‍ॅट्रिक इमर्जन्सी सेवातसेच स्तनांचे आरोग्यउच्च जोखीम असलेले गरोदरपणलॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि जनरल गायनेकोलॉजी अशा आरोग्यसेवा महिलांना प्रदान करण्यात येतात.