Chakan News : महाळुंगे येथे विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त, दोघांना अटक

चाकण/महाळुंगे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विक्रीसाठी आणलेल्या गांजासह दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा 8 किलो गांजा महाळुंगे पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.16) सायंकाळी पाचच्या सुमारास महाळुंगे येथील पालखी चौकात करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

करण उद्धव जाधव (वय-19), कैलास प्रभु जाधव (वय-19 रा. मालेगाव तांडा, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथील पालखी चौकात दोन तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पालखी चौकात सपाळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींकडे असलेल्या काळ्या बॅगेची खेड तालुक्याचे तहसिलदरा वैशाली वाघमारे यांच्या समक्ष झडती घेतली असता बॅगेत गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 70 हजार रुपयांचा 8 किलो 464 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. आरोपींनी हा गांजा कोठून आणि कोणाला देण्यासाठी आणला आहे याचा तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीक हे करीत आहेत.