कर्नाटकच्या शिमोगामध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, 8 लोकांचा मृत्यू, भूकंपासारखे बसले झटके

शिमोगा : कर्नाटकच्या ( Karnataka) शिमोगा जिल्ह्यात गुरुवार रात्री उशीरा ट्रकमध्ये भरून नेत असलेल्या स्फोटकांचा (डायनामाइट) भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही स्फोटकं खोदकामासाठी वापरली जाणार होती, असे समजते. स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या परिसरात झटके जाणवले. ही माहिती पोलिसांनी दिली.

घटना गुरुवार रात्री सुमारे 10.30 वाजताची आहे. दगड फोडण्याच्या खाणीजवळ रात्री ही भीषण घटना घडली, ज्याचे झटके केवळ शिमोगा जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या चिक्कमंगलुरु आणि दावणगिरी जिल्ह्यात सुद्धा जाणवले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की, घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर असे वाटले जसे की, भूकंप आला असावा. यानंतर ताबडतोब भूगर्भ तज्ज्ञांशी संपर्क साधण्यात आला, ज्यांनी भूकंप झाला नसल्याचे सांगितले.

शिमोगाचे जिल्हाधिकारी शिवकुमार यांच्यानुसार, एका रेल्वे क्रशर साइटवर हा डायनामाइटचा स्फोट झाला, ज्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला. हा स्फोट शिमोगा शहरापासून सुमारे 5-6 किलोमीटर अंतरावर झाला.

पोलीस अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले की, भूकंप नव्हता. शिमोगा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हंसुरमध्ये हा स्फोट झाला. एका अन्य पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, जिलेटिन घेऊन जात असलेल्या एका ट्रकमध्ये स्फोट झाला. ट्रकमध्ये असलेल्या सहा मजूरांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती आहे. ज्या ट्रकमध्ये हा भीषण स्फोट झाला, त्याचे तुकडे सर्वत्र पसरलेले होते.