चोरट्याचा बस प्रवासादरम्यान 8 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – खासगी बस प्रवासात चोरट्यानी 8 लाखाच्या दागिण्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कानसिंह राजपुरोहीत (वय.70,रा.कर्वेनगर ) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपुरोहीत हे त्यांचे मुळगाव राजस्थान येथून आपल्या कुटूंबासह खाजगी पुण्यात येत होते. प्रवासादरम्यान त्यांनी ज्या ठिकाणी साहित्य ठेवले होते. त्याच्या शेजारी एक अनोळखी महिला बसली होती. त्यावेळी फिर्यादींची नजर चुकावून पिशवीतली दोन डब्बे व सोन्या-चांदिचे दागिणे असा 8 लाख 13 हजार 600 रुपयांचा किंमती ऐवज चोरी केला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Visit : Policenama.com