मंत्रिमंडळ विस्तारात ‘विदर्भा’च्या वाट्याला 8 ‘मंत्रिपदं’, ‘या’ नेत्यांना संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने आज मंत्रिमंडळ विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातील 8 मंत्र्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. 7 जणांना कॅबिनेट मंत्रीपद तर एकाला राज्यमंत्रीपद अशी मंत्रिपदं विदर्भाच्या वाट्याला आली आहेत. आज 36 मंत्र्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडून मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

यात नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, काँग्रेसचे सुनिल केदार, बुलडाण्याचे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे, अमरावतीच्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, चंद्रपूरचे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यवतमाळचे शिवसेनेचे संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले असून अन्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी वेळी काँग्रेसचे नितीन राऊत यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. तर काँग्रेसचे नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळाले. या दोन्ही पदांचा समावेश केला तर विदर्भाच्या वाट्याला नऊ पदे आली आहेत. गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांना मात्र मंत्रिमंडळात सध्या स्थान मिळाले नाही. भंडारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही परंतु नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी महाविकासआघाडीकडून देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/