अजित पवारांसोबत गेलेले ‘ते’ 8 आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासुन फारकत घेतल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांनी आज (शनिवार) सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना आपल्या बाजुने वळवले होते.

दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेल्यांपैकी 8 आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे हे पवारांच्या भेटीला गेले होते. मात्र, सकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या शपथविधीसाठी गेलेले आणि अजित पवारांना समर्थन देणारी ही खालील 8 आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतले असल्याचे वृत्त आहे.

1. आमदार नरहरी झरवळ (दिंडोरी)
2. आमदार दिलीप बनकर (निफाड)
3. आमदार माणिकराव कोकाटे (सिन्नर)
4. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (बुलढाणा)
5. आमदार संदीप क्षीरसागर (बीड)
6. सुनील शेळके (मावळ)
7. सुनील भुसारा (विक्रमगड)
8. सुनील टिंगरे (वडगाव शेरी)

Visit : Policenama.com