काय सांगता ! होय, भारतात 6 महिन्याच्या मुलाच्या पोटातून काढलं 8 महिन्याचं ‘भ्रूण’, बनले होते ‘हात-पाय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पटनाच्या पीएमसीएचमध्ये एक चकित करणारे प्रकरण समोर आले. जेथे डॉक्टरांना एका सहा महिन्याच्या मुलाच्या पोटातून 8 महिन्याच्या मुलाचे मृत भ्रूण बाहेर काढले. यामुळे डॉक्टर देखील चकित झाले. डॉक्टरांनी सांगितले की हजारो लाखो असे एक प्रकरण घडते.

एका महिन्यापूर्वी बिहारच्या बक्सर जिल्हात राहणाऱ्या मोहम्मद मोइद्दीनने आपल्या 6 महिन्याच्या मुलाच्या पोटात दुखत असल्याने पीएमसीएचच्या शिशु विभागात दाखल केले होते. ज्यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅनमध्ये मुलाच्या पोटात भ्रूण दिसले. मुलं 6 महिन्याचे होते त्यामुळे त्यांच्या ऑपरेशनची तयारी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. गुरुवारी 4 डॉक्टरांच्या गटाने मुलाची सर्जरी करुन एक 8 महिन्याच्या मुलाचे मृत भ्रूण बाहेर काढले.

मुलाच्या पोटात एक गोळा होता आणि तो वाढत होता. मुलाला लघुशंका करण्यास त्रास होत होता, जेवण्यास देखील त्रास होत होता आणि मुलाची प्रकृती कमकुवत होत होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता आणि सांंगितले की त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. डॉक्टरांच्या मते 50 हजार मुलं जन्म घेतात परंतु अशी केस एखादीच असते. हा आजार जन्मजात असतो. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे.

पटना पीएमसीएचचे शिशु सर्जन डॉ. प्रदीप नंदन म्हणाले की मुलाला एक महिन्यापूर्वी अ‍ॅडमिट केले होते आणि त्यांच्या सर्जरीची तयारी एक महिन्यापासून सुरु होती. जेव्हा त्याला अ‍ॅडमिट केले. तेव्हाच कळाले की त्याच्या पोटात एक गोळा आहे. जेव्हा मुलाचा सीटी स्कॅन करण्यात आला तेव्हा पोटात भ्रूण असल्याचे निश्चित झाले. भ्रूणमध्ये हात पाय तयार झाले होते परंतु ते मृत होते.