Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांना समजू नका किरकोळ, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बहुतांश प्रकरणांमध्ये ब्लड क्लॉटला चांगले मानले जाते. जेव्हा तुम्हाला जखम होते तेव्हा हा क्लॉट रक्ताला वाहण्यापासून रोखतो. परंतु हा क्लॉट कधी-कधी तेव्हा होऊ लागतात जेव्हा आवश्यकता नसते. ब्लड क्लॉट तेव्हा धोकादायक होतात जेव्हा ते मासपेशींजवळ नसांमध्ये बनू लागतात. हा ब्लड फ्लो रोखतो ज्यामुळे कधी-कधी तो जीवघेणा ठरतो. ब्लड क्लॉटची लक्षणे कोणती आणि केव्हा डॉक्टरांशी संपर्क साधावा ते जाणून घेवूयात…

हात किंवा पायांवर सूज –

हात किंवा पयांना सतत सूज हे ब्लड क्लॉटचे प्रमुख लक्षण आहे. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधा.

हाता-पायांमध्ये वेदना –

सामान्यपणे ब्लड क्लॉटमध्ये सूज आणि स्किन लाल होण्याची लक्षणे दिसतात. मात्र कधी-कधी यामध्ये वेदना सुद्धा होतात. हातापायांच्या मासपेशींवर ताण येत असेल तर दुर्लक्ष करू नका. ब्लड क्लॉटची वेदना चालणे-फिरणे किंवा पाय वर उचलल्याने होऊ शकते.

त्वचा लाल होणे –

जखमेवर रक्त गोठणे सामान्य बाब आहे. यामुळे त्वचेचा रंग काहीवेळासाठी बदलतो, यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. नसांमध्ये ब्लड क्लॉट झाल्यास त्या ठिकाणची त्वचा जास्त लाल होते, गरम जाणवते.

छातीत वेदना –

छातीत वेदाना सामान्यपणे लोक हार्ट अटॅक समजतात परंतु हे पल्मोनरी एम्बोलिज्मचे लक्षण असू शकते. यामध्ये फुफ्फुसापर्यंत रक्त घेवून जाणार्‍या वाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट होतो. यावेळी छातीत वेदना होतात आणि श्वास घेतल्यावर वेदना वाढते. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

श्वास घेण्यास त्रास –

फुफ्फुसात रक्ताची गुठळी झाल्याने ऑक्सीजनचा फ्लो संथ होतो यामुळे श्वास घेण्यास अडचण येते.

सतत खोकला –

सतत खोकला येणे हे सुद्धा याचे लक्षण आहे.

हृदयाची धडधड वाढणे –

ऑक्सीजनचा फ्लो कमी झाल्याने हृदयाची धडधड वाढते. यामुळे छातीत वेदनाही होतात.

बेशुद्ध पडणे –

ब्लड क्लॉट झाल्यास फुफ्फुसातून केमिकल निघू लागते, ब्लड ऑक्सीजनमध्ये बदल होऊ लागतो, ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढू लागतो. यामुळे अचानक बेशुद्ध पडण्याची स्थिती होते.