नशीब असावं तर असं, 8 वर्षांचा कुत्रा बनला 36 कोटी रुपयांचा मालक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत एक कुत्रा 36 कोटी रुपयांचा मालक बनला आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. अमेरिकेच्या टेनेसी शहरात राहणारे बिल डोरिस मृत्यूनंतर आपला कुत्रा ’लूलू’ साठी 5 मिलियन डॉलर (36,29,55,250 रुपये) ची मोठी संपत्ती सोडून गेले आहेत. रिपोर्टनुसार, बिल डोरिस यांचे आपल्या 8 वर्षाच्या लूलूवर अतिशय प्रेम होते.

मृत्यूपूर्वी बिल डोरिस यांनी कुत्र्यासाठी आपले प्रेम व्यक्त केले आणि शेवटची इच्छा सांगितली की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती एका ट्रस्टमध्ये हस्तांतरित करावी जेणेकरून लूलूची चांगली देखभाल होऊ शकेल. बीबीसीच्या रिपोर्टनुसार डोरिस यांनी कुत्र्याला आपली मैत्रिण मार्था बर्टन हिच्या देखभालीत सोडले आहे. डोरिस यांच्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की, बर्टन यांना लुलुच्या योग्य देखरेखीसाठी ट्रस्टमधून मसिक खर्च दिला जावा.

आपला दिवंगत मित्र डोरिस आणि लूलूच्या नात्याबाबत सांगताना बर्टन म्हणाल्या, ते प्रत्यक्षात कुत्र्यावर खुप करत होते.

सध्या, हे स्पष्ट नाही की, डोरिसची संपत्ती किती आहे, परंतु द न्यूयॉर्क पोस्टनुसार, त्यांच्या मित्राने खुलासा केला की, त्यांच्याकडे खुप मोठी अचल संपत्ती आहे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

याशिवाय लूलूला मोठी रक्कम त्याच्या मालकाकडून मिळाली आहे, त्याचा मालक त्याच्या मर्जीने याचा वापर करू शकणार नाही. मृत्यूपत्रात केवळ योग्य मासिक खर्चासाठी बर्टन यांना पैसे देण्याची परवानगी आहे. एका कुत्र्यासाठी ही रक्कम त्याच्या वयाच्या कितीतरी पट जास्त आहे. बर्टन यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, त्यांना कुत्र्याची चांगली देखभाल करायची आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा एखाद्या मालकाने मृत्यूनंतर एखाद्या पाळीव प्राण्यावर करोडो रूपये सोडले आहेत.