आई अंगणात महिलांशी गप्पा मारत ‘मग्न’, नराधमाने घरात 8 वर्षाच्या बालिकेला केलं ‘नग्न’

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात 8 वर्षाच्या बालीकेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुपेश जनार्धन जाधव (वय-40) असे या नराधमाचे नाव असून खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.4) सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान घडली.

घटनेच्यावेळी आई महिलांशी गप्पा मारण्यात व्यस्त
पीडितेवर अत्याचार होत असताना तिची आई अंगणामध्ये महिलांशी गप्पा मारत होती. पिडित बालिका अंगणात खेळत होती. आरोपी जाधवने पीडित मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी रुपेश जाधव याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पीडितेची आई घराच्या अंगणात इतर महिलांशी गप्पा मारत बसली होती. आरोपी रुपेश जाधवने मुलीला नकळत घरात घेऊन गेला. घरामध्ये तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like