आणखी ३ महिने रुग्णायलातील 80 % खाटा राखीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा करोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढतच आहे. मंगळवारी राज्यात करोनाचे १५ हजार ७६५ रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजारांवर गेली आहे. तर एकूण रुग्णसंख्या आठ लाखांच्या वर गेलेली आहे. आतापर्यंत करोनाचे २४ हजार ९०३ बळी गेलेत. मुंबई-पुणे शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

करोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रूग्णांमध्ये करोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होतात, असेही काही केसेसमधून समोर आले आहे. डायबिटीज, बीपी, ह्रदयरोग आजार असलेल्या रूग्णांमध्येही तक्रार दिसून येत आहेत.