Health Alert ! ‘या’ 4 चुकांमुळं 80 % लोकांचं वजन नाही होत कमी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लठ्ठपणा आज कित्येक लोकांची समस्या बनली आहे. लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये घाम गाळण्यासोबत डायटिंगही करतात. असे असूनही, हवे ते परिणाम दिसून येत नाहीत. याचे कारण की वजन कमी करताना आपण काही चुका करतो, जे कॅलरी कमी होऊ देत नाहीत. या चुकांमुळे सुमारे ८०% भारतीय वजन कमी करण्यात अपयशी ठरतात. आपल्याला त्वरीत वजन कमी करायचे असेल तर प्रथम आपल्याला आपल्या चुका सुधारणे आवश्यक आहे …

१) निश्चित आहार घेणे

लोक वजन कमी करण्यासाठी ४-५ गोष्टींच्या मागे लागतात. त्यांना असे वाटते की उपाशी राहिल्याने वजन कमी होते तर तसे होत नाही. वजन कमी करण्यासाठी शरीराला कार्बोहाइड्रेट्स, मिनरल्स, विटामिन्स व फाइबर यांची देखील आवश्यक असते, जे एकाच प्रकारच्या पदार्थामध्ये आढळत नाहीत. आपण आपल्या आहारात प्रत्येक गोष्टीचा समावेश करणे महत्वाचे आहे.

२) शॉर्टकट हे सर्वात धोकादायक आहे

वजन कमी करण्यामध्ये ६०% व्यायाम आणि ४०% डाएट महत्वाचे आहे. पटकन वजन कमी करण्यासाठी बरेच लोक खाणे-पिणे सोडून देतात आणि एकदाच खातात. त्याच वेळी, काही लोक कठोर व्यायाम करण्यास सुरुवात करतात. जरी हे वजन कमी करत असले तरी या पद्धती स्नायू कमकुवत होतात. तसेच, पोषक तत्वांचा अभाव जास्त निर्माण होऊन थकवा, केस गळणे, नैराश्य, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकते.

३) पुरेसे पाणी न पिणे

अनेक जण दिवसभर पुरेसे पाणी पित नाहीत. यामुळे मेटाबॉलिज्म कमी होऊन आणि शरीर डिहाइड्रेशनचे शिकार होते. या मुळे वजन कमी होण्यास अडथळा येतो त्यामुळे जर आपल्याला पाण्याची चव लागत नसेल तर आहारात डीटॉक्स वॉटर, नारळपाणी, रस किंवा पाणी समृद्ध फळांचा समावेश करा.

४) अति ताणतणाव

जास्त ताणतणावामुळे शरीरात कार्टिसोल तयार होतो, ज्यामुळे चरबी कमी होण्याऐवजी जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे आपण किती व्यायाम आणि आहार घेतला तरी वजन कमी करू शकणार नाही. वजन कमी करायचे असल्यास ताणतणाव कमी करण्याचा विचार करा. यासाठी तुम्ही योगही करू शकता.

वजन कमी करण्याचा योग्य मार्ग

१) आहारात जास्तीत जास्त कच्चे कोशिंबीर, संपूर्ण धान्ये, ओटचे पीठ, सोयाबीन,फळे समाविष्ट करा. रोज वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फळे खा.

२) मसालेदार, जंकफूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा आणि अन्नातील तेलाचा वापर कमी करा.

३) आठवड्यातून १ वेळा आपण आपल्या आवडीचे जेवण घ्या परंतु त्यामध्ये आरोग्यासाठी हानीकारक पदार्थ खाऊ नका.

४) अधिक व्यायामाऐवजी आवश्यक व्यायाम करा.

५) पायर्‍या चढणे, मैदानी खेळ खेळणे, जॉगिंग करणे, धावणे, उद्यानात चालणे आणि योग करणे यासारख्या शारीरिक क्रिया करा.

६)  दररोज किमान ७-८ तासांची चांगली झोप घ्या. झोपेच्या आधी १ ग्लास हळदीचे दूध प्या.