काय सांगता ! होय, वाराणसीमध्ये केवळ ‘पॅरासिटामॉल’ अन् ‘अँटीबायोटिक्स’नी तंदुरूस्त झाले ‘कोरोना’चे रूग्ण

वाराणसी : वृत्तसंस्था – काशी किंवा बनारस म्हणून ओळख असणाऱ्या वाराणसीमध्ये एक आश्चर्यचकित असा प्रकार घडला आहे. येथील कोरोना संसर्गित रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती पाहून प्रशासन देखील हैराण झालं आहे. जगभरात एकीकडे कोरोना संसर्गित रुग्णांवरती वेगवेगळी औषध वापरून उपचार केले जात असताना. मात्र, वाराणसीत फक्त सामान्य औषधांनीच संसर्गित असलेले रुग्ण बरे होताना दिसत आहे.

वाराणसीमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयातील आकडेवारी चकित करणारी आहे. येथे आढळलेल्या एकूण कोरोना संसर्गित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) औषधाशिवायचं बरे झाले आहेत. इथल्या बहुतेक रुग्णांना साधारण पॅरासिटेमॉल (Paracetamol) आणि अँटिबायोटिक्स (Antibiotics) देण्यात आले आणि ते निगेटिव्ह झाले. याबाबत वाराणसीचे डीएम कौशल राज शर्माही येथील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती पाहून हैराण झालेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, येथील ८० टक्के कोरोना संसर्गित रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन औषध न घेताच बरे झालेत.

हायड्रोक्लोरोक्विन हे औषध मलेरियाच्या रूग्णांना दिल जात. आर्थराइटसवर च्या उपचारासाठी देखील हे वापरलं जात. जगभरातील अनेक देशांना भारताने या औषधाचा पुरवठा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले की, मी रोज एक हायड्रोक्लोरोक्विनची गोळी घेतो. कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी बिहारमध्ये सध्या या औषधाचा पुरेशा प्रमाणात साठा केला आहे. डीएम राज शर्मा म्हणाले, सध्याच्या स्थितीला वाराणसीत ८ लाख गोळ्या उपलब्ध आहे. या औषधाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचं एक स्टोर देखील येथे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. वाराणसीमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १०१ आहे. त्यापैकी ६८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे.