80 व्या वर्षी 80 Porsche कारचे मालक, कंपनी देखील त्यांची फॅन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वय फक्त एक संख्या असते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. परंतु व्हिएन्नामध्ये राहणाऱ्या ओटोकर जे सेने हे सिद्ध केले आहे की, जर आपल्याला खरोखर काही हवे असेल तर, वय केवळ एक संख्याच आहे. ओटोकर 80 व्या वर्षी 80 लक्झरी पोर्श कारचे मालक बनले आहेत. वाढत्या वयाबरोबर या वृद्ध व्यक्तीच्या पोर्श कारची संख्याही त्यानुसार वाढत आहे. दशकांमध्ये खरेदी केलेल्या 80 पोर्श कारची सीरिज पूर्ण करण्यासाठी, त्यांनी चकाकणार्‍या निळ्या रंगाची पोर्श बॉक्सस्टर स्पायडर कार खरेदी केली आहे.

या वयातही ओटोकारला पोर्श कारमध्ये मोकळ्या रस्त्यावर सिगार हातात घेऊन वेगाने जाणे आवडते. जगात पोर्श चाहत्यांची यादी जर असेल तर त्यामध्ये त्यांचे नाव टॉपवर नक्की येईल. ओटोकर म्हणतात की पोर्शबद्दलची त्यांची आवड सुमारे 50 वर्षांपूर्वी सुरु झाली, जेव्हा त्यांच्या घराच्या मागील बाजूस अशीच एक कार वेगाने जाताना पाहिली. गाडीचा वेग पाहून त्यांच्या मनात ती बसली. पुढच्या काही वर्षांत त्याांनी पैशाची बचत करण्यास सुरवात केली आणि अखेरीस स्पीड यलो 911E विकत घेतली. ही त्यांची पहिली पोर्श कार होती. नंतरच्या दशकात ओटोकारने एक 917, दुर्मिळ आठ सिलेंडर इंजिन असणारी एक 910, 904 त्याच्या मूळ फुहर्मन इंजिनसह आणि 956 कार जोडली. त्यांनी 80 पोर्श मोटारी खरेदी केल्या असून सध्या त्यांच्याकडे 38 कार आहेत.

ते म्हणाले की, मी महिन्याच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या पोर्श आणि आठवड्याच्या शेवटी दोन पोर्श कार चालवू शकतो, अर्थातच ही आवड केवळ ही वाहने खरेदी करण्याचा नाही तर त्यांना चालवण्याचीही आहे. या गाड्या ठेवण्यासाठी मोठ्या गॅरेजची आवश्यकता होती. नंतर यासाठी एक संपूर्ण इमारत बांधावी लागली. ओटोकर यांनी आपल्या पोर्श मोटारींसाठी वेगळी खास इमारत तयार केली आहे आणि त्यास ते आपले ‘लिव्हिंग रूम’ मानतात. त्यांच्या पोर्श मालिकेतील सर्व कार येथे ठेवल्या गेल्या आहेत, जे लांबून खेळण्यांच्या स्टोअरसारखे दिसते. पोर्श मोटारी दोन्ही बाजूंनी उभे आहेत. यात रेसिंग कारचा समावेश आहे. ही कार बनविणारी कंपनी ओटोकारचा आदर करते. ते स्वीकारतात की, या सुंदरता केवळ मशीन आहेत जोपर्यंत मनुष्य त्यांना आपला स्पर्श आणि प्रेम देत नाही. लोकांशिवाय कार फक्त कार असतात. हे लोकच या मशीन्सना श्वास देतात.