अरे देवा ! ‘या’ 80 वर्षाच्या महिलेचा 35 वर्षाच्या युवकावर जीव जडला, लवकरच बांधणार लगीनगाठ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘प्रेम आंधळं असतं’ असं आपण अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं आहे. परंतु हे वाक्य एका जोडप्याने खरे करून दाखवले आहे. त्यांनी वयाचा कसलाही विचार न करता एकमेकांवर मनापासून प्रेम केले. ३५ वर्षांचा मोहम्मद अहमद आणि त्याची ८० वर्षीय गर्लफ्रेंड आयरिस जोन्स आजकाल आपल्या नात्याबद्दल खूप चर्चेत आहेत.

इजिप्तच्या मोहम्मद अहमदने नुकतीच ब्रिटीश सरकारच्या निवृत्तीवेतनाचा आनंद घेणाऱ्या एका ८० वर्षीय महिलेशी रिलेशनशिप मध्ये असल्याची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर दोघे लवकरच लग्न देखील करणार आहेत.

मोहम्मद अहमदच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. असे असले तरी लोकांची पर्वा न करता दोन्ही अजूनही एकमेकांना डेट करत आहेत.

एका अहवालानुसार आयरिस या मोहम्मद अहमदच्या आईपेक्षाही २० वर्षांनी मोठ्या आहेत. मोहम्मद अहमदचे म्हणणे आहे की, ‘जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्यावर प्रेम करते तेव्हा वयाने काही फरक पडत नाही.’

सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांची ओळख ही सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. या नंतर दोन्ही एकमेकांना पसंत करू लागले आणि लवकरच त्यांची मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

सोशल मीडियावर काही लोक यास पैसे उकळण्याचे माध्यम समजत आहेत. परंतु सरकार कडून आयरिसला फक्त २०० पौंड म्हणजे जवळपास १९,००० रुपये पेन्शन मिळते.

आयरिसने मोहम्मद अहमदबरोबर तिचे लैंगिक संबंधही असल्याचे उघड केले आहेत. आयरीसने सांगितले की तिने गेल्या ४० वर्षांपासून सेक्सबद्दल विचार देखील केला नव्हता.

मोहम्मद अहमद च्या भेटीनंतर त्यांनी लवकरच शारीरिक संबंध देखील बनवले.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला आणि ते कोर्टात देखील गेले, परंतु पुरेसे कागदपत्रं उपलब्ध नसल्याने लग्न होऊ शकले नाही.

आता त्या दोघांचे लग्न तेव्हाच होईल जेव्हा आयरिस इजिप्तला जाऊन आपली पूर्ण कागदपत्रे घेऊन येणार आणि हे सिद्ध करेल की तिने आपल्या पतीला ४० वर्षांपूर्वीच घटस्फोट दिला आहे.