वीर धरणाच्या विद्युत गृहातून नीरा नदीत 800 क्युसेकने ‘विसर्ग’

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन – नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाल्यामुळे मंगळवारी (दि.११) सकाळी वीर धरण ९४.२६ टक्के भरले होते. तसेच सोमवारी नीरा खोऱ्यातील धरण परिसरात पाऊस झाल्यामुळे मंगळवारी (दि.११) वीर धरणात ५ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत असल्यामुळे संध्याकाळी चारच्या दरम्यान वीर धरण ९६ टक्के भरले. त्यामुळे वीर धरणाच्या विद्युत गृहातून नीरा नदीत ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.