Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चा हाहाकार ! 8 तासात 62 नवे रुग्ण, तर 3 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. मुंबईत अवघ्या 8 तासात कोरोना रुग्णांची संख्या 62 वर गेली आहे तर आज दिवसभरात महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची सख्या 416 वर पोहचली आहे. तर मुंबईत कोरोनामुळे 24 तासात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीती वाढत असून प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हजारो झोपड्या असलेल्या धारावीत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईत 57 ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली हे अद्याप समजू शकले नाही. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 5 नवे रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी 4 रुग्ण पूर्व भागातील तर 1 रुग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील 3 रुग्ण हे लग्न सोहळ्याशी संबंधीत आहेत तर 1 जण कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्याला संसर्ग झाला आहे. या सर्व रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालिकेकडून हेल्पलाइन नंबर जाहीर
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधाव तसेच अधिक माहितीसाठी बाई रुक्मीणीबाई रुग्णालयात, कल्याण येथील 0251-2310700 आणि शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली येथील 0251 – 2481073 आणि 251 – 2495338 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like