Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 8139 नवे पॉझिटिव्ह तर 223 जणांचा मृत्यू, 4360 रूग्णांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासातील भयानक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात तब्बल 8139 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर 223 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 4360 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 46 हजार 600 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये 99 हजार 202 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहे तर तब्बल 1 लाख 36 हजार 985 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत 10 हजार 116 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासातील आकडेवारी समोर आल्यानंतर राज्यातील जनतेची चिंता आणखी वाढली आहे. तब्बल 8139 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्यात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या ही वाढत आहे. राज्य सरकारनं तपासण्या वाढवण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वच शहरातील तपासण्यांची प्रमाण वाढले आहे.