पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८२ लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेला अटक करुन ८१ लाख ७५ हजार ३२ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. हि कारवाई सीमा शुल्क विभागाने आज (गुरुवार) केली. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून तब्बल तीन किलो सोने जप्त केले आहे.

बेबी शिवजी वाघ असे सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आज एअर इंडीयाच्या विमानाने पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने तिच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता तिच्या जवळील चार प्लास्टिक बॅगमध्ये ३ किलो २८० ग्रॅम वजनाचे सोने सापडले. सोन्याची पेस्ट करुन हे सोने प्लॅस्टीकपिशवीतून आणले होते. तिने हे सोने बाहेरच्या देशातून आणल्याचा संशय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना असून तिच्याकडे चौकशी सुरु आहे. या महिलेवर सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई सह आयुक्त के.आर रामा राव, उपायुक्त हर्षल मेटे, अधीक्षक सुधा अय्यर, एस.आर. सोमकुवर, पी.पी. करवंडे, विकास पोमन, निरीक्षक अमजद शेख, बी.एस. हगावणे, जी.एस. जोशी, क्रांती कुमार, हेड कॉन्स्टेबल डी.एन. नाटक, ए. एन. भट यांच्या पथकाने केली.