विधानसभा 2019 : परळीचा 82 वर्षांचा ‘हा’ नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात !

परळी : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तशी उमेदवारांनी वाढवली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजणच जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. अशातच एक ८२ व्य वर्षी करून प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीविषयी आम्ही तुम्हाला सांगतात आहोत जे ऐकून तुम्ही चकीत व्हाल. ९० च्या दशकात म्हणजेच १९८५ साली परळी रेणापूर मतदारसंघातून स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारे पंडितराव दौंड यांनी आता धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा घेतली असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

गोपीनाथ मुंडेंचा केला होता पराभव :
आज ८२ वर्षांचे असणारे पंडितराव दौंड हे माजी आमदार असून १९८५ ते १९९० या काळात परळी रेणापूर मतदारसंघाचे त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. या निवडणुकीत ते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उभे राहून ३५०० च्या मताधिक्याने निवडूनही आले होते. त्यावेळी ते मोठ्या चर्चेत आले होते. आता वयाच्या ८२ व्य वर्षी ते राजकारणात झाल्याचे दिसत असून धनंजय मुंडे यांचा जोमाने प्रचार करत आहेत. यासाठी ते मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेऊन धनंजय यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

परळीतील लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष :
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांमध्ये असलेल्या परळीच्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. परळी येथील काँग्रेसचे टि.पी मुंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पंकजा यांची बाजू मजबूत झाल्याचे दिसत आहे मात्र अशातच माजी आमदार पंडितराव दौंड धनंजय मुंडेंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्यानंतर ही लढत आणखीनच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Visit : Policenama.com