Coronavirus : चेन्नईच्या ITC ग्रँड चोला हॉटेलचे 85 कर्मचारी पॉझिटिव्ह

चेन्नई : चेन्नई येथील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलच्या ८५ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान केलेल्या चाचणीत हा प्रकार समोर आला आहे.

आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमधील कर्मचार्‍याची कोरोना चाचणी घेण्यात आली. तेव्हा त्यांच्यातील एकाला १५ डिसेंबरला लागण झाली असल्याचे दिसून आले. त्यानंतर दर दिवशी हा आकडा वाढतच गेला. २० डिसेंबरला एकाच दिवशी १० जणांना लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर दररोज काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत होते. ३१ डिसेंबर रोजी १६ आणि १ जानेवारी रोजी १३ कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या १५ दिवसात या हॉटेलमधील एकूण ८५ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

आयटीसी ग्रँड चोला हे पंचतारांकीत हॉटेल चेन्नईमधील महत्वाच्या हॉटेलपैकी एक आहे. या ठिकाणी ५२२ लक्झरी रुम, तसेच ३८ लक्झरी अपार्टमेंटमध्ये ६०० रुम आहेत. या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने हॉटेल व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे.