सांगली जिल्ह्यात सापडला ८५० वर्षांपुर्वीचा शिलालेख

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

खानापूर तालुक्यातील कोळदुर्ग (पळशी ) किल्ल्यावर सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख कन्नड लिपीतील चालुक्य कालीन शिलालेख असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  ‘बा रायगड’ परिवाराच्या दुर्ग प्रेमींना किल्ल्याची सफाई करताना हा लेख आढळून आला. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर व  प्राध्यापक गौतम काटकर यांनी या लेखावर संशोधन करून अभ्यासपूर्ण निष्कर्ष समोर आणले आहेत. या लेखाच्या शोधामुळे जैन धर्मियांच्या प्रभावाची माहिती मिळते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ce6cc12-c652-11e8-bf41-f735f76cca70′]

खानापूर तालुक्यात पळशी गावच्या हद्दीत कोळदुर्ग हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. गेल्या वर्षीपासून ‘बा रायगड’ दुर्गप्रेमी संस्थेने या किल्ल्याच्या सवंर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. या परिवाराचे अरूण पाटील, बाळासोहब पाटील,   कृष्णा गुडदे व सहकारी किल्ल्याच्या डागडुजीचे काम करीत आहेत. या किल्ल्यावर जागोजागी जुन्या मंदिराचे अवशेष, वीरगळ, सतीशिळा आढळून आल्या आहेत. हे अवशेष एकत्र करीत असताना  भग्न अवस्थेतील एक  शिलालेख आढळून आला. सदर शिलालेखाची माहिती दुर्गप्रेमी अ‍ॅड. फिरोज  तांबोळी यांच्यातर्फे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेवर व  गौतम काटकर यांना मिळाली.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’499b69f0-c652-11e8-a445-f9e2ba3b427d’]

कुमठेकर आणि काटकर यांनी सदर किल्ल्यावर जाऊन शिलालेखाचे ठसे घेतले. सदर शिलालेख हा ‘हळेकन्नड’ म्हणजेच जुन्या कन्नड लिपित आहे. शिलालेखाचा सुरूवातीचा भाग भग्न झाला आहे. शिलालेखाच्या उर्वरित भागात मध्यभागी एका आसनस्थ साधूची मूर्ती असून एका बाजूला चंद्रकोर आहे. शिलालेखात सुरूवातीच्या भागात एका जैन मुनींचे वर्णन आहे.  या शिलालेखात स्पष्ट कालोल्लेख नसला तरी चालुक्य राजा ‘जगदे्कमल्ल’ या नावाचा उल्लेख आहे. हा राजा इ.स.११३८ ते ११५० या दरम्यान राज्य  करीत होता. सदर शिलालेख १७ ओळीचा असून काही अक्षरे पुसट झाली आहेत.
[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’141e0644-c652-11e8-b73b-732e717d6884′]

सांगली जिल्ह्यात चालुक्य राजाच्या कारकिर्दीत जैन धर्मियांना दान दिलेले शिलालेख बोरगाव (ता.कवठेमहाकाळ),  भाळवणी (ता.खानापूर) येथे आढळले आहेत. कोळदुर्गवर सापडलेल्या या नव्या लेखामुळे जिल्ल्ह्यातील जैन धर्मियांच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडणार आहे. खानापूर आणि तालुक्यात गेली अनेक वर्षे जैन धर्मीय आढळून येत नाहीत. मात्र एकेकाळी  या परिसरात जैन धर्मियांचे वास्तव्य होते हे या शिलालेखावरून स्पष्ट होते.  या संशोधनासाठी त्यांना कन्नड विद्यापीठ हंप्पी येथील संशोधक मार्गदर्शक डॉ.व्ही.एस. माळी यांचे  सहकार्य मिळाले.

जाहिरात