8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 8th Pay Commission | आगामी काळात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात नव्या सूत्राने वाढ होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी 2016 मध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत नवी माहिती दिली आहे. याअंतर्गत आता केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार निश्चित करण्यासाठी 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्याचा विचार नाही. परंतु, नव्या फॉर्म्युल्यानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार दरवर्षी ठरवण्यात येणार आहेत.

 

अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार 8 व्या वेतन आयोगापेक्षा वेगळे काहीतरी करत आहे. 8 व्या वेतन आयोगावर (8th Pay Commission) कोणताही विचार सध्या करत नाही. निवृत्तीवेतनधारक विचार करत आहेत. मात्र 8 व्या वेतन आयोगावर अद्याप कोणताही विचार केला जात नाही. ते म्हणाले की, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनाचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोग स्थापन करण्याची गरज भासू नये.

 

काय आहे नवीन फॉर्म्युला ?

आता कर्मचार्‍यांचे पगार Aykroyd फॉर्म्युल्यानुसार ठरणार आहेत.
सूत्रानुसार, कर्मचार्‍यांचे वेतन महागाई, राहणीमानाचा खर्च आणि कर्मचार्‍यांच्या कामगिरीशी निगडीत असेल.
म्हणजेच कर्मचार्‍यांची पदोन्नतीही त्यानुसार होणार आहे.
मात्र, अर्थमंत्रालयातील एका अधिकार्‍याचे म्हणणे आहे की, ही सूचना चांगली आहे,
मात्र आतापर्यंत अशा कोणत्याही सूचनेवर विचार करण्यात आलेला नाही.
दुसरीकडे, 8 वा वेतन आयोग देखील कधी येणार याबद्दल देखील काहीही माहिती नाही.

 

7 व्या वेतन आयोगाची शिफारस

उल्लेखनीय आहे की याआधी 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशीत न्यायमूर्ती माथूर म्हणाले होते की, आम्हाला Aykroyd फॉर्म्युल्यानुसार वेतन रचना ठरवायची आहे.
या नियमात कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा देखील विचार केला जातो.
हा फार्म्युला वॉलेस रुडेल आयकरॉईड यांनी दिले होते.
7 व्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकारने कर्मचार्‍यांचे किमान वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये केले होते.
जस्टीस माथुर यांनी शिफारशीत म्हटले होते की,
सरकारने प्राईस इंडेक्सनुसार दरवर्षी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगाराचा आढावा घेतला पाहिजे.

 

Web Title : – 8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा