Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चे एकूण 9 रूग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.