UP : वडिल मजुरी करून चालवायचे कुटुंब आणि मुलीच्या अकाऊंटमध्ये जमा होते 9 कोटी 99 लाख, जाणून घ्या प्रकरणी

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –  बलिया जिल्ह्यातील बांसडीह भागातील रुकुनपुरा गावात राहणाऱ्या एक मुलीच्या बँक खात्यात १० कोटी रुपये आल्याने खळबळ उडाली आहे. ती आपल्या आईसह बँकेत गेली, तेव्हा कर्मचार्‍यांनी बँक खात्यात पैसे आल्याची पुष्टी केली. बँकेने खात्यातून व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या प्रकरणी किशोरीने बांसडीह कोतवाली येथे संपर्क साधून लेखी तक्रार देऊन कारवाईची विनंती केली आहे.

रुकुनपुरा गावच्या सुभेदार साहनी यांची मुलगी सरोजचे अलाहाबाद बँकेच्या बांसडीह शाखेत खाते आहे. खात्यातील व्यवहार करण्यासाठी सरोज बँकेत गेली आणि खात्यात पैसे असलेल्या पैशांची माहिती बँक कर्मचाऱ्यांकडू मिळाली.

तिच्या खात्यात जमा केलेली रक्कम ९ कोटी ९९ लाख चार हजार सातशे छत्तीस रुपये असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली. बँक व्यवस्थापनाने तिच्या खात्याच्या व्यवहारांवर बंदी घातली असल्याचेही कर्मचार्‍यांनी सांगितले. अनेक वेळा रुपयांच्या व्यवहाराची माहितीही बँक खात्यातून देण्यात आली. या माहितीनंतर तिला धक्का बसला.

सरोज बांसडीह कोतवाली येथे पोहोचली आणि पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. सरोजने या प्रकरणात तक्रार पत्र देऊन कारवाईची विनंती केली आहे. सरोजने तक्रारीत अशी माहिती दिली आहे की, तिचे खाते अलाहाबाद बँकेत २०१८ मध्ये उघडले गेले आहे. दोन वर्षांपूर्वीच कानपूर देहात जिल्ह्यातील पोस्ट बाधीर गाव पाकरा येथील निलेश कुमार नावाच्या व्यक्तीने तिला फोन करून पीएम आवास मिळण्याच्या नावाखाली आधार कार्ड आणि फोटो इत्यादी देण्यास सांगितले होते.

सरोजने आधार कार्डची फोटो कॉपी व इतर कागदपत्रे पत्त्यावर पाठवली. यानंतर सरोजला पोस्टद्वारे एटीएम कार्ड मिळाले. नीलेशने सरोजला तिचे एटीएम कार्ड मागितले, तेव्हा सरोजने निलेशला पोस्टाने एटीएम कार्डही पाठवले. यानंतर सरोजने नीलेशला तिच्या पिनकोडचीही माहिती दिली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सरोजने रुपयांच्या व्यवहाराबाबत पूर्ण नाकारले आहे. तिने नमूद केले आहे की, पैसे कोठून आले हे तिला माहित नाही. तसेच खात्यात जमा झालेल्या रकमेशी तिचा काही संबंध नसल्याचेही तिने म्हटले आहे.

निलेशच्या ज्या मोबाईल नंबरवरून तिचे बोलणे व्हायचे, तो मोबाइल स्विच ऑफ सांगत आहे. बांसडीह कोतवालीचे निरीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. तपासणीनंतर आवश्यक कारवाई केली जाईल.

अलाहाबाद बँक बांसडीह शाखेचे व्यवस्थापक सरोज कुमार सिंह यांनी सांगितले की, कोतवाली परिसरातील रुकनपुरा येथे राहणाऱ्या सुभेदार साहनीचे खाते २-८-२०१८ रोजी उघडले होते. या खात्यात अनेकदा दहा-वीस हजार जमा झाले आहेत आणि काढले गेले आहेत. २-८-२०१८ पासून २२-०१-२०२० पर्यंत खात्यात १,७५,९१२० जमा झाले आहेत आणि १७५३८५७ काढण्यात देखील आले आहेत. याच दरम्यान खलीलाबाद शाखेकडून फोनवर माहिती मिळाली की, या अकाउंट नंबरद्वारे चुकीचे ऑनलाइन व्यवहार केले जात आहेत. या माहितीवरुन आमच्या माजी शाखा व्यवस्थापकाने १५-२-२०२० रोजी या खात्यावर अंदाजे दहा कोटींचा ताबा ठेवला होता. या खात्यात सध्या ५२६३.०५ आहेत.