९० कोटींचा बँक घोटाळा : ईडीचे ९ ठिकाणी छापे

चेन्नई : वृत्तसंस्था

मेसर्स इंसुमती रिफायनरीज प्रायव्हेट लिमिटेड (आयआरपीएल) कंपनीने भारतीय स्टेट बँकेच्या चेन्नई येथील परदेशी शाखेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना कंपनीने बनावट कंपन्या तयार करून ४६ हमीपत्र तयार केली होती. ही हमीपत्रे ८७.३६ कोटी रुपयांची होती. यामुळे बँकेला ९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या ९० कोटींच्या घोटाळयाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तामिळनाडूत ९ ठिकाणी छापे टाकले आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20788a13-b41a-11e8-9e89-0d83676c4906′]

या छाप्यांची माहिती देताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयआरपीएल या कंपनीशी संबंधित प्रकरणात विरुदुनगर, मदुरई आणि कोईम्बतूरमध्ये शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापन आर. शेनबगान आणि इतरांद्वारे केले जात आहे. त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात येत आहे.

आयआरपीएलला भारतीय स्टेट बँकेच्या चेन्नई येथील परदेशी शाखेकडून नकदी कर्जाची सुविधा, हमीपत्र आणि मुदतीचे कर्ज मिळाले होते. कंपनीने बनावट कंपन्या तयार करून ४६ हमीपत्र तयार केली होती. ही हमीपत्रे ८७.३६ कोटी रुपयांची होती. यामुळे बँकेला ९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ईडीने सीबीआयच्या एफआयआर आणि आरोपपत्राच्या आधारे सावकारी विरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्या नोंदवला आहे.

Please Subscribe Us On You Tube

इंधन दरवाढीविरोधात उद्या भारत बंद : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांची बंदची हाक