महाराष्ट्रातील ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य सरकारने सोमवारी (दि.१३) सायंकाळी राज्यातील ९ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये नागपुरचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांची एग्रीक्लचर आणि एडीएफ विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तत्कालीन प्रधान सचिव के.वी. कुरुंदकर यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. तर आभा शुक्ला यांची सहकार विपणन आणि टेक्सटाईल विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8296d47-9f02-11e8-bfe1-514707e9a9f6′]
परिवार कल्याण विभागाचे आयुक्त आणि राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनचे निर्देशक डॉ. संजय कुमार यांची नागपुरच्या अतिरीक्त विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पदाचा देखील अतिरीक्त पदभार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे. ठाणे महानगर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीच्या जिल्हाजिधीकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधीकारी एम.पी. कल्याणराव यांची श्रम, उद्योग, ऊर्जा वभागाचे सह सचिव पदी नियुक्त करण्यात आली आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिव पदी तर मुख्यमंत्र्यांचे सह सचिव राजेश नार्वेकर यांची ठाण्याच्या जिल्हाधीकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरचे अतिरीक्त विभागीय आयुक्त आर.एच ठाकरे यांची नागपुर महापालीकेच्या अतिरीक्त आयुक्त पदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी आणि नाशिक कलावान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संचालक अमन मित्तल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.