कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हादरवले ! आतापर्यंत 9 लाख लोकांनी सोडला महाराष्ट्र, प्रतिबंधामुळे राज्याला होऊ शकतो 82 हजार कोटींचा तोटा!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमध्ये मजूरांचे पालायन विक्राळ रूप घेऊ लागले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा झाला आहे की, एप्रिलच्या सुरुवातीच्या 12 दिवसात सुमारे 9 लाख लोकांनी महाराष्ट्रातून परत आपल्या राज्यांची वाट धरली. स्थिती इतकी गंभीर होत चालली आहे की, आता उद्योजक सुद्धा या मजूरांना रोखण्यास इच्छूक नाहीत.

एसबीआयच्या रिपोर्टनुसार, 1 ते 12 एप्रिलच्या दरम्यान वेस्टर्न रेल्वेकडून 196 ट्रेनमध्ये 4.32 लाख लोकांनी प्रवास केला. यापैकी 150 रेल्वे गाड्या केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी गेल्या. यामधून 3.23 लाख लोक पुन्हा आपल्या राज्यात परतले. इतकेच नाही तर या दरम्यान सेंट्रल रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या 336 ट्रेनमध्ये 4.70 लाख प्रवाशांनी महाराष्ट्रातून आपल्या राज्याची वाट धरली. या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहारसह आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडीसा राज्यांसाठी रवाना झाल्या.

रिपोर्टनुसार, मोठ्या प्रमाणात औद्योगिक हालचाली असलेल्या महाराष्ट्रात लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होतील. सध्याच्या प्रतिबंधामुळे राज्याला 82 हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो आणि येणार्‍या दिवसात हे प्रतिबंध वाढले तर तोटा सुद्धा सहाजिकच वाढणार आहे.

बेड, ऑक्सीजन आणि लसीची टंचाई मोठी समस्या
इंडिया एसएमई फोरमच्या डायरेक्टर जनरल सुषमा मोरथानिया यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सीजन टंचाईची समस्या वाढत चालली आहे. अशावेळी मजूरांना रोखल्यास महामारी आणखी पसरू शकते. शिवाय महाराष्ट्रात कोरोना लसीची सुद्धा टंचाई आहे.

आर्थिक स्थिती बिघडली
अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर अमिल बसोले यांच्यानुसार मागील लॉकडाऊनच्या दरम्यान मजूरांच्या पलायनाने त्यांची आर्थिक स्थिती खुपच बिघडलीह होती. मोठ्या कालावधीनंतर कामकामज सुरू झाले होते. अशावेळी मजूरांसाठी सतत शहराकडे निघणे अवघड होईल.